BBC Innovators : व्हीडिओ लिंकद्वारे गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी 'सेहत कहानी'

पाकिस्तानमध्ये दर 20 मिनिटांनी एका महिलेचा गरोदरपणात किंवा बाळाला जन्म देताना मृत्यू होतो. आणि याचं मुख्य कारण म्हणजे महिला डॉक्टरांची अनुपलब्धता.

डॉ. सारा सईद आणि डॉ. ईफ्फत झफर यांनी 'सेहत कहानी'ची स्थापना केली. 'सेहत कहानी' ही संस्था दाईंना प्रशिक्षण देते आणि व्हीडिओ लिंकद्वारे त्यांचं महिला डॉक्टरांशी बोलणं करून देते.

'सेहत कहानी'नं आतापर्यंत एक लाख 40 हजार लोकांना मदत केली आहे.

पॉलिन मेसन यांचा बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या इनोव्हेटर्स मालिकेसाठीचा रिपोर्ट.

बीबीसीच्या या प्रकल्पाला बिल आणि मेलिंडा गेट्स फाउन्डेशनकडून अर्थसहाय्य मिळालं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)