व्हीडिओ - नितीन आगे खटला : 'निकाल ऐकल्यावर मला आत्महत्या करावी वाटली'

व्हीडिओ - नितीन आगे खटला : 'निकाल ऐकल्यावर मला आत्महत्या करावी वाटली'

नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्यानंतर नितीन आगेचे वडील राजू आगे यांनी नाराजी व्यक्त केली.

"माझ्या नितीनला न्याय मिळेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. निकाल ऐकल्यावर मला वाटलं, मी आता घरी पळत जाऊन कुठंतरी आत्महत्या करावी," असं राजू आगे यांनी म्हटलं.

"मला शक्य असेल तोपर्यंत मी न्यायासाठी लढेन," असं राजू आगे म्हणतात.

हे पाहिलंत का?

रिपोर्टिंग - मयुरेश कोण्णूर

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)