पाहा व्हीडिओ : अमेरिकेतल्या मुस्लीम समुदायातील समलैंगिकांची कथा

पाहा व्हीडिओ : अमेरिकेतल्या मुस्लीम समुदायातील समलैंगिकांची कथा

अमेरिकेतल्या मुस्लीम समुदायात मोठी झालेली अरूज सांगतेय किती अवघड असतं समलैंगिक म्हणून मान्यता मिळणं...

ग्रेसन ट्रांसजेंडर आहे, तर अरूज स्वतःला गे समजते. दोन वर्षांपासून दोघी एकमेकांच्या प्रेमात आहेत. मुस्लीम समुदायातून येत असल्यानं अरूजसाठी समलैंगिक असणं आणि कुटुंबाला ते समजावणं या दोन गोष्टी अवघड होत्या.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप अध्यक्ष झालेत, तेव्हापासून मुस्लीम समुदाय वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे.

इस्लाम धर्मीयांचा समलैंगिकतेला कायम विरोध राहीला आहे, असं समजलं जातं. पण गेल्या दहा वर्षांमध्ये अमेरिकेत त्यात बदल झालेला आढळतो. एका ताज्या सर्वेक्षणानुसार आपल्या समाजानं समलैंगिकता स्वीकारली पाहिजे, असं मुस्लीम तरुणाईला वाटतं.

दुसरीकडं फक्त 36 टक्के प्रोटेस्टंट ख्रिश्चनांची समलैंगिकतेला मान्यता आहे, असं हे सर्वेक्षण सांगतं. असं असलं तरी, अमेरिकेत कट्टर मुस्लीमांचा असाही एक गट आहे जो समलैंगिकांना मृत्युदंडच दिला पाहिजे, असं मानतो.

अरूज 17 वर्षांची असताना तिच्या घरात ती समलैंगिक असल्याचं कळलं. "त्यानंतर आई मला वारंवार इस्लामची आठवण करून द्यायची. तिचं म्हणणं होतं की, समलैंगिकतेला तिचा विरोध असला तरी ती मला समजू शकते," अरूज म्हणते.

"तिला माझ्या भावना आता कळतात, म्हणून मी तिच्याशी सर्व काही शेअर करते. मी जशी आहे, तसं स्वीकारायला तिला 20-22 वर्षं लागली," असंही अरूजनं सांगितलं.

वॉशिंग्टनहून बीबीसी रिपोर्टर इरम अब्बासी यांचा रिपोर्ट

हे बघितलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)