पाकिस्तानातल्या शिव मंदिराच्या तलावाला पडली कोरड
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : पाकिस्तानातल्या मंदिराचा तलाव पडला कोरडा

पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात काटस राज नावाचं प्राचीन शिव मंदिर आहे. या हिंदू मंदिराच्या आवारात एक तलाव आहे.

पण, मंदिरच्या परिसरात भूजल पातळी आटल्यानं हा तलाव कोरडा पडला आहे. या भागातल्या सिमेंट कारखान्यांनी भूजलाचा उपसा केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं इथल्या स्थानिक हिंदूंचं म्हणणं आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे.

बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांचा रिपोर्ट.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)