हिंगोलीतील पवार कुटुंबातल्या कोमलची हृदयद्रावक कहाणी

हिंगोलीतील पवार कुटुंबातल्या कोमलची हृदयद्रावक कहाणी

हिंगोलीतील जोडतळ या गावात पवार हे एकमेव पारधी कुटुंबीय होतं. तीन वर्षांपूर्वी या कुटुंबातील कर्ते सुंदरसिंग पवार आणि त्यांच्या तीन मुली मंदाकिनी, पूजा आणि पूनम यांना तलावात बुडवून ठार करण्यात आलं.

त्यापूर्वी याच कुटुंबातल्या कोमलचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न गावातील काही जणांनी केला होता. त्यांच्याविरोधात रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याचंही पुढे काहीच झालं नाही.

वडील गमावले, तीन बहिणी गमावल्या, त्याला आज तीन वर्षं झाली. आज कोमलला न्यायाची प्रतीक्षा आहे. पण अजूनही न्याय मिळेल, याची खात्री नाही.

तुम्ही हे वाचलंत का?

बीबीसी मराठीसाठी अमेय पाठक यांचा रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)