जेव्हा या मुलांनी पहिल्यांदा समुद्र बघितला...

जेव्हा या मुलांनी पहिल्यांदा समुद्र बघितला...

रिओ द जनेरिओमध्ये आलेल्या आफ्रिकन निवार्सितांची ही मुलं आहेत. आजवरचं त्यांचं आयुष्य नको त्या संघर्षातून गेलं. आपलं घर, गाव आणि देश सोडून एका अनोळखी ठिकाणी सुरक्षित पोहोचणं, त्यांना सर्वाधिक महत्त्वाचं होतं.

त्यांच्यापैकी अनेक मुलं काँगोतून आले होते, तर काही सिएरा लिओन, आयव्हरी कोस्ट आणि पापुआ न्यू गिनीमधून रियोला आले होते.

आता सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्यावर तिथल्या नवनवीन गोष्टींचा या मुलांना आस्वाद घेता येतोय.

एका स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या सहलीमुळं त्यांना पहिल्यांदा समुद्र पर्यटनाचा आनंद घेता आला. ब्राझीलच्या प्रसिद्ध कोपाकबाना या बीचवर जाऊन त्यांनी समुद्र पाहिला. अथांग समुद्र, उंचच उंच लाटा आणि कसलीही बंधनं नाहीत.

मग काय? स्वच्छंद मस्ती करायची.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)