जेरुसलेमबाबत जागतिक नेत्यांनी दिला ट्रंप यांना कडक शब्दात इशारा

जेरुसलेमबाबत जागतिक नेत्यांनी दिला ट्रंप यांना कडक शब्दात इशारा

इस्राईलमधल्या 86 दूतावासांपैकी एकही जेरुसलेमध्ये नाही. डोनाल्ड ट्रंप हे समीकरण बदलू पाहात आहेत.

ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. याचं इस्राईलनं स्वागत केलं असलं तरी अरब देशांनी याचा निषेध केला आहे.

"ट्रंप यांच्या या निर्णयामुळे जागतिक सुरक्षेला आणि शांततेला मोठा धोका निर्माण होईल," असं पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांनी म्हटलं आहे.

तर "जेरुसलेम राजधानी झाल्यास तुर्कस्तान इस्राईलबरोबरचे सगळे संबंध तोडेल," असं टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेजेप ताय्यीप एरडोआन यांनी म्हटलं आहे.

तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)