अमेरिकेच्या घोषणेनंतर जेरुसलेममध्ये उसळलेला हिंसाचार

अमेरिकेच्या घोषणेनंतर जेरुसलेममध्ये उसळलेला हिंसाचार

अमेरिकेच्या घोषणेनंतर जेरुसलेममध्ये पॅलेस्टिनी आंदोलकांनी निदर्शनं सुरू केली. या निदर्शनांना हिंसक वळण लागलं. इस्राईलने ही प्रतिक्रिया लक्षात घेऊन लष्करी तुकड्या या भागात तैनात केल्या होत्या.

आंदोलकांनी दगडफेक सुरू केल्यानंतर इस्राईली लष्कराने अश्रुधुराची नळकांडी फोडली. तसंच रबराच्या गोळ्या बंदुकीतून मारून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गोळीबारही केला.

या कारवाईत 31 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारपासून इस्लामी गट हमासने इंतिफिदाची हाक दिल्यामुळे या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)