पाहा व्हीडिओ : आगीपासून जीव वाचवण्यासाठी सशाची केविलवाणी धडपड

पाहा व्हीडिओ : आगीपासून जीव वाचवण्यासाठी सशाची केविलवाणी धडपड

'द थॉमस फायर' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कॅलिफोर्नियातल्या वणव्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

या आगीपासून वाचण्यासाठी मुक्या प्राण्यांचीही धडपड सुरू आहे. असाच एक बिथरलेला ससा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता.

एका बाजूला असलेला महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला पसरणारा वणवा, यामुळे त्याला कुठे जायचं कळत नव्हतं. त्याची ही धडपड पाहून एका सहृदय माणसानं धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर शेवटी त्याचा जीव वाचवण्यात यशही आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)