पाहा व्हीडिओ : चिनी नागरिकांवर असेल सीसीटीव्हीची बारीक नजर

पाहा व्हीडिओ : चिनी नागरिकांवर असेल सीसीटीव्हीची बारीक नजर

अख्खा चीन देश CCTV कॅमेऱ्यांनी वेढला जाणार आहे. ते ही अद्ययावत कॅमेऱ्यांनी.

त्यात चेहरा ओळखण्याबरोबरच तुमचा पत्ता, तुमचे मित्र आणि नातेवाईक त्याचबरोबर तुमचं घर आणि कार अशी सगळी माहिती नोंदवली जाणार आहे.

कॅमेराने टिपलेली सगळी माहिती पोलीस नियंत्रण कक्षात जमा होईल. प्रत्येक नागरिकाचा एक आयडी तयार होईल. आणि तुमच्यावर लक्ष ठेवणं पोलीसांना शक्य होईल.

तुमची अख्खी कुंडली पोलिसांकडे तयार असेल. याचा उपयोग अर्थातच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केला जाणार आहे.

पण, तुमच्या खाजगी आयुष्यात या कॅमेऱ्याची ढवळाढवळ असेल. म्हणून या यंत्रणेला विरोधही होतो आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांनी या कॅमेऱ्याचं प्रात्यक्षिक या व्हीडिओतून सादर केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)