पाहा व्हीडिओ : मालवण किनाऱ्यावर टनावारी मृत माशांचा खच, गूढ कायम

पाहा व्हीडिओ : मालवण किनाऱ्यावर टनावारी मृत माशांचा खच, गूढ कायम

सिंधुदुर्गातील मालवणच्या किनाऱ्यावर तारली जातीचे मृत मासे मोठ्या प्रमाणावर वाहून आले आहेत. या माशांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ओखी वादळाच्या परिणामामुळे हे मासे मृत होऊन वाहून आल्याचं स्थानिक मच्छीमारांचं म्हणणं आहे. मात्र, ओखी वादळामुळेच या माशांचा मृत्यू झाला असेल, असं स्पष्टपणे सांगता येत नाही, अशी माहिती मत्स्य अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी दिली.

त्यामुळे हजारो तारली माशांचा खच नेमका कशामुळे हे गूढ अद्याप उलगडलेलं नाही.

बीबीसी मराठीसाठी सपना नाईक यांचा रिपोर्ट (एम. खान यांच्या अधिक माहितीसह)

आणखी पाहा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)