पाहा व्हीडिओ : तब्बल 35 वर्षांनंतर सौदीत होणार चित्रपट प्रदर्शित

पाहा व्हीडिओ : तब्बल 35 वर्षांनंतर सौदीत होणार चित्रपट प्रदर्शित

तब्बल 35 वर्षांनंतर सौदी अरेबियात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामुळे नैतिकतेला धक्का पोहोचतो असं मत व्यक्त करत सौदीतले सर्वोच्च धार्मिक नेते मुफ्ती शेख अब्दुल अजीझ अल शेख यांनी मात्र चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला आहे.

असं असलं तरी, जनतेचा मोहम्मद बिन सलमान यांच्या सुधारणांना पाठिंबा असल्याचं अधिकारी सांगतात. त्यांनी अलीकडेच महिलांना गाड्या चालवायची परवानगी दिली आहे. पण, हा त्यांचा पीआर स्टंट असल्याची टीका विदेशातले टीकाकार करतात.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)