मेट्रोचे बोगदे खणण्यासाठी मुंबईच्या जमिनीखाली यंत्रांची घरघर

मुंबईत भुयारी मार्ग बनवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचं आव्हान आहे, ते ही भुयार खोदणारी यंत्रं जमिनीखाली पोहोचवण्याचं!

ही यंत्रं एकदा जमिनीखाली पोहोचली की, वरच्या वाहतुकीला कोणताही धक्का न लावता भुयार खोदण्याचं काम सुरू असतं.

त्यापैकी पहिलं यंत्र माहीम इथे रहेजा हॉस्पिटलच्या समोर नया नगर इथे जमिनीखाली जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यासाठी 30 मीटर खोल गोलाकार खड्डा खणण्यात आला. हा खड्डा खणल्यानंतर भोवतालची माती, ढेकळं पडू नयेत, यासाठी सिमेंटचा वापर करून भिंतींना मुलामा देण्यात आला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)