सवाई गंधर्व महोत्सव : राजन-साजन मिश्रांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

सवाई गंधर्व महोत्सव : राजन-साजन मिश्रांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

डिसेंबर उजाडला की पुणेकरांसह समस्त संगीत रसिकांना वेध लागतात ‘सवाई गंधर्व’चे. 65वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात 13 डिसेंबरपासून सुरू झाला.

सालाबादाप्रमाणेच न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणातल्या भव्य मंडपात संगीताची ही मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी खुली झाली आहे.

अनेक दिग्गज तसेच नवोदित कलाकार यंदाच्या 'सवाई गंधर्व' महोत्सवात आपली कला सादर करत आहेत.

पहिल्या दिवशी पंडित राजन मिश्रा आणि पंडित साजन मिश्रा यांचे शास्त्रीय गायन रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले.

पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

17 डिसेंबरपर्यंत सवाईचे स्वर पुण्यात उमटतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)