पाहा व्हीडिओ : विदर्भातल्या हिवाळी पार्ट्यांचा मानबिंदू - रोडगे

पाहा व्हीडिओ : विदर्भातल्या हिवाळी पार्ट्यांचा मानबिंदू - रोडगे

थंडी सुरू झाली की, राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये शेतावर जाऊन किंवा माळावर जाऊन माळावरच्या मेजवान्यांची सुरुवात होते.

शेतावर जायचं, मस्त एखादा पदार्थ तिथेच शिजवायचा, शेतातल्या खोपटाबाहेर बसून उन-उन खायचा आणि वरून लोटाभर पाणी ठेवून द्यायचं... अशा मस्तीत या मेजवान्या चालतात.

रोडगे हा प्रकारही काहीसा तसाच आहे. काही भागांमध्ये याला पानगेही म्हणतात. एखादी रशाची झणझणीत भाजी, वरण, त्यावर तूप, आणि पोळ्यांऐवजी रोडगे.

कसे असतात रोडगे आणि कसे बनवले जातात ते?

स्टोरी आणि शूटिंग : गजानन उमाटे

एडिटिंग आणि निर्मिती : रोहन टिल्लू

तुम्हाला हे माहिती आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)