पाहा व्हीडिओ : खंडाळ्याच्या घाटात अनोखी सायकल राईड

पाहा व्हीडिओ : खंडाळ्याच्या घाटात अनोखी सायकल राईड

वयाच्या 62व्या वर्षीही केवळ 35 मिनिटांमध्ये हा घाट चढणारे जागतिक किर्तीचे सायकलपटू म्हणजे अशोक खळे. त्यांना आदरांजली म्हणून रविवारी खंडाळा घाटात सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं

जागतिक सायकलपटू अशोक खळे यांना 'घाटाचा राजा' म्हणून ओळखलं जायचं. सायकल चालवत असतानाच गेल्या महिन्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरामध्ये 1800 फूट उंची गाठणारा खंडाळा घाट हा सायकलस्वारांसाठी सर्वांत आव्हानात्मक घाट मानला जातो. जवळपास 70 सायकलस्वारांनी घाटात सायकलिंग करून 'शिंग्रोबा'च्या या लाडक्या सायकलपटूच्या स्मृतींना उजाळा दिला.

'मुंबई-पुणे' सायकल स्पर्धेमध्ये अशोक खळे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले पण स्पर्धा संपल्यावर आनंदाने मिठी मारणारे अशोक कॅप्टन हे देखिल आपल्या मित्राच्या आठवणी जागवायला आवर्जून उपस्थित होते.

स्टोरी आणि शूटिंग : प्रशांत ननावरे

एडिटिंग आणि निर्मिती : निरंजन छानवाल

तु्म्ही हे बघीतलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)