पाहा व्हीडिओ : उत्तरांच्या शोधात मुक्ता दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013ला खून झाला. या घटनेला 54 महिने होऊन गेले आहेत.

पण मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. तर दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला पुण्यात ज्या ठिकाणी दाभोलकर यांची हत्या झाली त्या ठिकाणी निदर्शनं करतात.

दाभोलकर यांची मुलगी मुक्ता या चळवळीत काम करतात. वडिलांचा खून, मारेकऱ्यांना शोधण्यात येत असलेलं अपयश आणि दुसरीकडे चळवळीचं काम जोमाने उभं करण्याचं आव्हान या सगळ्यांकडे एक मुलगी म्हणून त्या कसं पाहतात? जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत.

(बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट, शूट, एडिट - शरद बढे)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)