पाहा व्हीडिओ : मुंबई वाचली, पण केरळचे शेकडो मच्छिमार 'ओखी'त बेपत्ता

ओखी चक्रिवादळाच्या तडाख्यातून मुंबई आणि महाराष्ट्र थोडक्यात बचावला, पण त्या आधी या वादळानं दक्षिणेत थैमान घातलं होतं. केरळमधल्या परिस्थितीचा हा ग्राउंड रिपोर्ट.

दक्षिण भारताच्या किनाऱ्यावर ओखी वादळ धडकलं, तेव्हा शेकडो मच्छिमार समुद्रात होते. केरळातील असे अनेक मच्छिमार ओखी वादळानंतर बेपत्ता आहेत.

या मच्छिमारांच्या कुटुंबांना त्यांच्या परत येण्याची प्रतीक्षा आहे. पण दिवसागणिक ती आशाही आता मावळत चालली आहे. किमान त्यांचे मृतदेह मिळाले तर विधीवत अंत्यसंस्कार करता येतील, असं या कुटुंबांना वाटतं.

संजॉय मुजूमदार यांचा रिपोर्ट. शूट - संजय गांगुली

तुम्ही हे बघीतलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)