ऐंशी वर्षांची स्विमर आज्जी!

ऐंशी वर्षांची स्विमर आज्जी!

80 व्या वर्षीही निर्मला भिडे नियमित पोहायचा व्यायाम करतात. इतरांना पोहण्याचे धडेही देत आहेत.

नाशिकच्या निर्मला भिडे यांना लहानपणापासूनच पोहायची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षी डहाणूला असताना त्या आपल्या मैत्रिणींबरोबर विहिरीवर पोहायला जायच्या.

दीड वर्षांपूर्वी गुजरातमध्ये फिरायला गेलेल्या निर्मला भिडे यांना एका गायीने धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या बरगड्यांना इजा पोहोचली होती.

निर्मला भिडे यांनी डॉक्टरांकडे जायला नकार देत फक्त आपल्या 'स्विमिंग थेरपी'वर विश्वास ठेवला. "या व्यायामामुळेच मी पुन्हा चालू शकले," निर्मला भिडे सांगतात.

"लहानपणापासून मी कधीच आजारी वगैरे पडले नाही. सर्दी किंवा कणकण वगैरे एखाद दिवशी आली तरच. बाकीचे साथीचे रोग वगैरेंपासून मी लांबच होते."

सगळ्यांना त्या सल्ला देतात, "तुम्ही नियमितपणे पोहण्याचा व्यायाम केलात, तर कोणताही आजार तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही."

(व्हीडिओ स्टोरी - मार्मिक गोडसे बीबीसी मराठीसाठी)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)