माळावरची मेजवानी - कोल्हापूरचं रस्सामंडळ!
माळावरची मेजवानी - कोल्हापूरचं रस्सामंडळ!
महाराष्ट्राचं वर्णन वसंत बापटांनी 'राकट देशा, कणखर देशा' असं केलं आहे. त्यातलं राकट आणि तरीही राजसपण कोल्हापूरच्या मातीत घट्टं मुरलं आहे. कोल्हापूरची आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही अशीच आहे.
पहाटे आखाड्यात घुमणारा, सकाळी तर्रीबाज मिसळ रिचवणारा, सोबत लोटीभर धारोष्ण दूध पिऊन दुपारी कामाला लागणारा, संध्याकाळी 'रक्काळ्या'वर फिरणारा, रात्री मस्त शेमला-पटका वगैरे बांधून लावणीचा आस्वाद घेणारा कोल्हापूरकर तांबड्या-पांढऱ्या रश्श्याच्या आठवणीनंही नादावतो.
याच कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा एक पैलू म्हणजे रस्सामंडळ!
शूटिंग - स्वाती पाटील-राजगोळकर
एडिटिंग आणि निर्मिती - रोहन टिल्लू
तुम्हाला हेदेखील वाचायला आवडेल
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)