पाहा व्हीडिओ : एवढं मोठं ख्रिसमस ट्री... तेही मुंबईमध्ये?

पाहा व्हीडिओ : एवढं मोठं ख्रिसमस ट्री... तेही मुंबईमध्ये?

भारतात सर्वांत मोठं आणि सुंदर ख्रिसमस ट्री कुठे असेल? काश्मिरात, हिमाचल प्रदेशात की उत्तराखंडमध्ये? पण जर याचं उत्तर मुंबई आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

वरळीत राहणाऱ्या डग्लस सल्डाना यांनी लावलेल्या ख्रिसमस ट्रीबद्दल आज बोलूया.

तसं तर याही पेक्षा मोठी आणि प्रचंड उंच ख्रिसमस ट्री भारतात असतील, पण नैसर्गिकरीत्या वाढवलेलं, आणि ख्रिसमससाठी पूर्ण सजवलेलं हे एकमेव झाड असावं, असा दावा सल्डाना यांनी केला आहे.

65 फूट उंचीचं हे झाड ते दरवर्षी आपल्या बहिणीच्या आठवणीत सजवतात. आणि त्यांच्या या झाडाची 2012 साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही नोंद झाली होती.

असं काय आहे या झाडात?

स्टोरी, शूटिंग आणि एडिटिंग - राहुल रणसुभे

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)