दक्षिण कोरियातल्या भारतीय महिला शेफ

दक्षिण कोरियातल्या भारतीय महिला शेफ

दीपाली प्रवीण या मुळच्या उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या आहेत. सध्या त्या दक्षिण कोरियात राहतात.

पतीच्या फिरतीच्या नोकरीमुळे दीपाली यांना वेगवेगळ्या देशांत जावं लागतं. त्यांचं आयटी क्षेत्रातली उच्चशिक्षण असलं तरी व्हिसासंबंधीच्या कडक नियमांमुळे त्यांना सर्व देशांमध्ये नोकरी करू शकत नाहीत.

मग त्यांनी एक कलिनरी कोर्स केला. स्वयंपाकाचं हे रिसतस प्रशिक्षण घेतलं आणि आज त्या या आवडीचं काम करत आहेत. नुसतं आवडीचं कामच नाही, तर त्या दक्षिण कोरियातल्या लोकप्रिय शेफ बनल्या आहेत. शेफसाठी असलेली वर्ल्ड कप स्पर्धा त्यांनी जिंकली आहे.

पाहा... दीपाली प्रवीण यांचा प्रेरणादायी प्रवास.

हे वाचलं का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)