कमला मिल आग: तर ही दुर्घटना टळली असती?

कमला मिल आग: तर ही दुर्घटना टळली असती?

मुंबईच्या लोअर परळ भागातल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जण ठार झाले आहेत. या आगीला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

कमला मिल कंपाउंडची दुर्घटना थांबवता आली असती का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

कारण, या परिसरातल्या व्यावसायिक आस्थापनांनी केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध तक्रारी यापूर्वीच महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या, असं आता समोर येत आहे.

(बीबीसी मराठीसाठी मयुरेश कोण्णूर आणि जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट. शूट आणि एडिट - शरद बढे)

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)