पाहा व्हीडिओ : मुंबई हल्ल्यातील आरोपी हाफिज सईद याची मुलाखत

पाहा व्हीडिओ : मुंबई हल्ल्यातील आरोपी हाफिज सईद याची मुलाखत

"अमेरिका भारताचीच भाषा बोलत आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्टया संकटात असल्याने दबावातून आमच्यावर ही बंदी लादली जात आहे. पण कोर्टानं मला नेहमीच आरोपमुक्त केलं आहे," असं लष्कर-ए-तोयबा या कट्टरतावादी संघटनेचा संस्थापक आणि जमात-उद-दावा या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद म्हणाला.

बीबीसी प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांच्याशी खास बातचीत करताना हाफिज सईदने त्याच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दल, तसंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काही विधानं केली आहेत.

मोदींबद्दल केलेल्या विधानांबद्दल आम्ही भारताची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. पण या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

रिेपोर्टर - शुमाईला जाफरी

शूट आणि एडिट - फकीर मुनीर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)