डर्टी पिक्चरः कचऱ्याच्या ढिगावर बसून मॉडेल काढतात फोटो
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मॉडेलिंग!

इना मकोसी या इतर फोटोग्राफरसारख्या नाहीत. जिथं कचऱ्याचा ढीग असेल तिथंच त्या मॉडेलचे फोटो घेतात.

सेनेगलच्या डकरमधल्या हान खाडी परिसरात इना मकोसी यांनी नुकतंच एक फोटोशूट पूर्ण केलं आहे. औद्योगिक सांडपाणी आणि कचऱ्यामुळे हा किनारा प्रदूषित झाला आहे.

लोकांनी समुद्रात कचरा टाकू नये, कचरा साफ करण्याची लाज बाळगू नये, हा संदेश देणं या मागचा उद्देश असल्याचं त्या म्हणतात.

2014 साली पिकीने उपनगरातून इना यांनी हा उपक्रम सुरू केला. शूटनंतर दोन आठवड्यांनी या भागातल्या नागरिकांनी कचरा हटवला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)