पाहा : स्पर्शज्ञान असलेला कृत्रिम हात पाहिलात का?

पाहा : स्पर्शज्ञान असलेला कृत्रिम हात पाहिलात का?

स्पर्श समजू शकणाऱ्या कृत्रिम हाताची निर्मिती करण्यात रोममधल्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. ज्या व्यक्तींना त्यांचा हात गमवावा लागला आहे, अशांसाठी हे संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे.

अपघातात हात गमावल्यावर अनेक बाबी कठीण होऊन जातात. अशा लोकांसाठी कृत्रिम हातचा पर्याय असतो. पण या हातांना स्पर्शज्ञान नसतं.

पण आता रोममधल्या शास्त्रज्ञांनी स्पर्शज्ञान असलेला कृत्रिम हात तयार केला आहे. या हातामुळे वस्तूंचा आकार, त्या वस्तूंची स्थिती आदी बाबी समजू शकतात.

या कृत्रिम हाताच्या बोटांना असलेले सेंसर्स कंप्युटरला जोडलेले असतात. व्यक्तीच्या हाताच्या वरच्या भागात बॅटरी बसवून या सेंसरकडून येणारे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवले जातात.

हे संशोधन सध्या अंतिम टप्प्यात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)