पाहा व्हीडिओ: 'इथं आल्यापासूनच मला जात, धर्म, भाषा यांच्यावरुन भेदभावाचा सामना करावा लागला.'

पाहा व्हीडिओ: 'इथं आल्यापासूनच मला जात, धर्म, भाषा यांच्यावरुन भेदभावाचा सामना करावा लागला.'

मूळ तामिळानाडूचे डॉ. मारी राज गुजरातमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.

आपण दलित असल्यानं कॉलेजमधल्या प्राध्यपकांपासून सहाध्यायांनी आपल्याशी भेदभाव केला, अत्याचार केलेत आणि आपल्या शिक्षणात व्यत्यय आणला, असा त्यांचा आरोप आहे.

त्याच्या एमबीबीएस डिग्रीवरही शंका घेण्यात आल्या. सगळ्यांसमोर अपमान करण्यात आला. अनधिकृतपणे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. उपचार करत असलेल्या डॉक्टरनं डिस्चार्ज कार्डही दिलं नाही.

कोणताही प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरही भेटायला आलेले नाहीत, असं डॉ. मारी राजचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)