राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ विकासाच्या प्रतीक्षेत?

12 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजामाता यांचा 420वा जन्मदिन आहे. दरवर्षीप्रमाणे जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजा इथे शिवप्रेमींची गर्दी जमली आहे.

या वर्षी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार, आमदारांसह अनेक नेते सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहेत.

सिंदखेडचे लखोजीराजे जाधव आणि म्हाळसाराणी यांच्या जिजाऊ या कन्या. 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला. या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देऊ असं आश्वासन दिलं होतं. तो 315 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

'जिजाऊंच्या जन्मस्थळ विकासासाठी देऊ असं आश्वासन दिलेले 311 कोटी कुठे आहेत?' असा सवाल जाधव घराण्याच्या 17व्या पिढीशी संबंधित असलेल्या शिवाजीराजे जाधव यांनी केला आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)