पानिपतचं तिसरं युद्ध झालं तिथे आज काय आहे?
पानिपतचं तिसरं युद्ध झालं तिथे आज काय आहे?
मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अशा पानिपतच्या युद्धाला यंदा 257 वर्ष पूर्ण झाली. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठी साम्राज्याला धक्का पोहोचला.
दोन मोती गळाले, सत्तावीस मोहरा हरपल्या आणि चिल्लखुर्द्याची गिनतीच नाही, असं या लढाईचं वर्णन बखरींमध्ये केलं आहे. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव या खाशा सेनापतींसह हजारो मराठे इथे मारले गेले.
पानिपतच्या काला आम्ब परिसरात ही युद्धभूमी आहे. तिथेच या वीरांचं स्मारक उभारलं आहे. दरवर्षी या ठिकाणी वीरांच्या स्मृतिंना वंदन करायला स्थानिक जमतात.
शूट आणि एडिट रोहन टिल्लू, बीबीसी मराठी
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)