हरियाणातील रोड मराठे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - पानिपत : हरियाणातल्या रोड मराठ्यांनी असा साजरा केला शौर्यदिन

अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या सैन्यात 14 जानेवारी 1761ला पानिपतच्या युद्धभूमीवर तुंबळ लढाई झाली. या युद्धात मराठा सैन्याचा पराभव झाला असला तरी, या युद्धाच्या स्मृती जागवण्यासाठी इथं या दिवशी शौर्यदिन साजरा केला जातो.

हरियाणातील रोड मराठे हे स्वतःला मराठा समजतात. अलीकडच्या काळातच त्यांना ही नविन ओळख मिळाली आहे. पानिपतच्या युद्धानंतर याच भागात राहिलेल्या मराठा सैनिकांचे ते वंशज असल्याचं म्हटल्या जातं.

पानिपतावर लढलेल्या मराठ्यांचे काही वंशज आताच्या हरयाणात आजही राहिले आहेत. 14 जानेवारीला दरवर्षी पानिपत इथं शौर्यदिवस साजरा करण्यासाठी ते एकत्र जमतात. त्यांना रोड मराठा असं म्हटलं जातं.

या दिवशी पानिपत, करनाल, कैथल, सोनिपत, रोहतक जिल्ह्यातून युद्ध स्मारकाच्या ठिकाणी रोड मराठे एकत्र येतात. या युद्धात शहीद झालेल्या मराठा सैन्यांना अभिवादन करतात.

यंदाच्या पानिपत शौर्यदिनाची झलक पाहण्यासाठी हा व्हीडिओ बघा.

शूट - रोहन टिल्लू, मनोज ढाका. एडिट - निरंजन छानवाल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?