बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर कशी काय पोहोचली कार?

बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर कशी काय पोहोचली कार?

कॅलिफोर्नियाच्या सँटा अॅनामध्ये एक विचीत्र घटना घडली. एक कार चक्क बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर जाऊन पोहोचली.

वेगात असलेल्या कारने दुभाजकाला धडक दिल्यानंतर हवेत झेप घेतली. चक्क उडत गेलेली ही कार एका बसच्या समोरच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झाली.

गाडीत असलेल्या दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. गाडीचा चालक ड्रग्सच्या नशेत होता. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

तु्म्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)