महाराष्ट्र : मध्ययुगीन शिलालेखांमार्फत धमकीचा संदेश?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ पाहा : गधेगळांवरील शिल्पाचा अर्थ काय?

महाराष्ट्रात 10व्या ते 16व्या शतकांत आढळणाऱ्या गधेगळ या शिलालेखांवर गाढव आणि स्त्रीच्या संभोगाचं शिल्प कोरलेलं आहे. तत्कालीन राजांनी दिलेल्या या दानपत्रातला हा धमकीवजा संदेश असल्याचा दावा पुरातत्त्वज्ञांनी केला आहे.

राजानं या शिलालेखावर लिहिलेला मजकूर किंवा आदेश पाळला न गेल्यास तुमच्या कुटुंबातील महिलांवर असा प्रसंग ओढावेल असा त्यामगचा अर्थ असल्याचं पुरातत्त्वज्ञांचं म्हणणं आहे.

बीबीसी मराठीसाठी संकेत सबनीस यांचा हा रिपोर्ट.

शूट - राहूल रणसुभे आणि एडिटिं- परवेझ खान

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)