पाहा व्हीडिओ : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

पाहा व्हीडिओ : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतल्या राजपथावर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे.

यंदा या चित्ररथावरून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला.

एक ट्रॅक्टर-ट्रेलरवर उभारलेल्या भव्यदिव्य रथावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला भरलेला दरबार दाखवण्यात आला होता. जवळजवळ 48 पुतळे आणि 10 कलाकार त्यात होते.

महाराष्ट्राच्या या चित्ररथाची संकल्पना प्रा. नरेंद्र विचारे यांची आहे, तर रचना नामवंत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलं होतं.

रिपोर्टर - समृद्धा भांबुरे

शूट - गुलशनकुमार वनकर

एडिट - परवाझ लोण

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)