पाहा व्हीडिओ : अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमच्या महिलांचा छळ करणाऱ्या डॉक्टरला 175 वर्षांची शिक्षा

पाहा व्हीडिओ : अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमच्या महिलांचा छळ करणाऱ्या डॉक्टरला 175 वर्षांची शिक्षा

150हून जास्त मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लॅरी नॅसर या जिम्नॅस्टिक्स टीमच्या डॉक्टरला 175 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

त्याने छळलेल्या महिलांनी कोर्टात एकापाठोपाठ लॅरीचा छळ जगासमोर आणला.

अत्याचार करणाऱ्यांनो, तुमची वेळ भरली आहे, या एका वाक्यानं असा अत्याचार करणाऱ्यांचा थरकाप उडायला हवा, असं एकीनं भर कोर्टात म्हटलं.

मी आताच तुमच्या मृत्यू वॉरंटवर सही केली आहे, हे वाक्य आहे रोझमेरी अँक्वेलिया या न्यायमूर्तींचं. लॅरी नॅसरवर यापूर्वी लहान मुलांवरील अत्याचारसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे.

चार वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिमोन बाईल्स हिच्यासह लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या 4 जणींनी, अनेक मित्रांनी, राज्यस्तरीय जिम्नॅस्टनी शोषणाचा कोर्टात पाढा वाचला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)