#BudgetWithBBC : 'पायाभूत सुविधा, शिक्षणावर अधिक लक्ष द्यावं'
#BudgetWithBBC : 'पायाभूत सुविधा, शिक्षणावर अधिक लक्ष द्यावं'
केंद्र सरकारच्या बजेटबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. देशाची आर्थिक दिशेबरोबरच आणि सर्वसामान्यांचं गणितही या बजेटवर अवलंबून असतं. यंदाचं बजेट 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. यानिमित्तानं बीबीसी समाजातील विविध स्तरांतील लोकांची मतं जाणून घेत आहे.
इंजिनीअर असलेल्या ध्रुवेश शेठला सरकारचं काम चांगलं वाटतं. जीएसटीचं तो कौतुक करतो. शिवाय देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग सुरू असल्याचं तो म्हणतो. पण सरकारनं पायाभूत सुविधा आणि शिक्षण यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं तो म्हणतो.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)