पाहा व्हीडिओ : पॅरिसला पुरानं वेढलं

पाहा व्हीडिओ : पॅरिसला पुरानं वेढलं

पॅरीसमधल्या सीन नदीचं पाणी धोक्याच्या पातळीच्या वर पोचलं आहे. पुरानं वेढलेल्या पॅरीसची ही ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेली दृश्य.

नदीकिनारची घरं आणि दुकानं रिकामी करण्यात आली आहेत. संपूर्ण पॅरिस शहरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनानं सीन नदीचं पाणी आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे.

सततच्या धुवांधार पावसानं ही परिस्थिती उद्भवली आहे. शहरातली महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं नदीकिनारी असल्यानं पर्यटकांनीही काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)