पाहा व्हीडिओ : सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हरियाणामध्ये जत्रा

पाहा व्हीडिओ : सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हरियाणामध्ये जत्रा

सदाशिवराव भाऊ पेशवे यांचा पानिपतच्या युद्धात मृत्यू झाल्याचं महाराष्ट्रात मानलं जातं. मात्र, ते युद्धातून वाचले आणि हरियाणातल्या सांघी गावात जाऊन राहिले असं हरियाणातल्या या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

या गावात सदाशिवराव भाऊंनी नंतर एक मठ स्थापन केला, असं मानलं जातं. त्यांनी माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या 13व्या दिवशी समाधी घेतल्याचे गावकरी सांगतात. या समाधीच्या दिवशी गावात खूप मोठी जत्रा भरते. या वर्षी 29 जानेवारीला ही जत्रा भरली होती.

बीबीसी मराठीसाठी निर्मिती - संकेत सबनीस. शूटींग - मनोज ढाका

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)