पाहा व्हीडिओ : न्यूझीलंडच्या पंतप्रधान घेणार प्रसूती रजा

पाहा व्हीडिओ : न्यूझीलंडच्या पंतप्रधान घेणार प्रसूती रजा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन गरोदर आहेत. जूनमध्ये त्यांची प्रसूती अपेक्षित आहे.

बाळाच्या जन्मानंतर 6 आठवडे रजा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याची माहिती आर्डन यांनी पत्रकारांना दिली.

पंतप्रधानपदावर असताना प्रसूती होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरतील.

यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना 1990ला पदावर असताना बाळ झालं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)