#BollywoodSexism काय सांगतेय कल्की - बॉलीवूडमध्ये लैंगिक शोषण होतं का?
पुरुषी दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या ड्रीम गर्ल्सना भेटा बीबीसीच्या खास सीरिजमध्ये.
"लैंगिक शोषण फक्त बॉलीवूडमध्येच होतं, असं अजिबात नाही. एखाद्या सेलेब्रेटीबद्दल असं झालं तर ते हेडलाइन्समध्ये येतं. पण याबद्दल सगळ्यांनी बोलणं आवश्यक आहे. फक्त सेलिब्रेटींनीच बोललं पाहिजे असं का ? मला हे मुळीच मान्य नाही," सांगत आहे कल्की केकलां.
बॉलिवूडमधला सेक्सिझम ड्रीमगर्ल या सीरिजमधून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत.
या सीरिजमध्ये सर्वांत प्रथम यावर बोलत आहे अभिनेत्री कल्की केकलां.
"भारतात याविषयी बोलण्यासाठी MeToo कॅम्पेनसारखा एखादा प्लॅटफॉर्म हवा की जिथे आपली ओळख न सांगता आपलं म्हणणं मांडता येईल. ज्यांना याबद्दल बोलायचं आहे त्यांना या माध्यमातून बोलता येईल. यातून बाकीच्या लोकांना कळेल की, आपण एकटे नाही," असं कल्की सांगते.
स्टोरी- जाल्टसन एसी आणि विष्णू वर्धन
निर्माता- जान्हवी मुळे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)