#BollywoodDreamgirls 'बॉलीवूडसारख्या इंडस्ट्रीत महिलांनी प्रकाशयोजनाकार म्हणून काम करावं'

#BollywoodDreamgirls 'बॉलीवूडसारख्या इंडस्ट्रीत महिलांनी प्रकाशयोजनाकार म्हणून काम करावं'

पुरुषी दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या ड्रीम गर्ल्सना भेटा बीबीसीच्या खास सीरिजमध्ये. या सीरिजमध्ये आज भेटू या गॅफर हेतल डेढिया यांना.

हेतल डेढिया या चित्रपट आणि मालिका चित्रिकरणावेळी गॅफिंग अर्थात प्रकाशयोजनेचं काम करतात.

कोणता लाइट कधी लागेल, तो लाइट कुठे असेल आणि त्याचा परिणाम काय होईल हे लक्षात घेऊन त्यांना काम करायचं असतं.

या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व आहे. हेतल या क्षेत्रात आल्या त्या वेळी एकही स्त्री इथे काम करत नव्हती.

विविध कॅमेऱ्यांच्यावेळी कुठली प्रकाशयोजना करू शकतो आणि कुठली नाही हे समजून काम करावं लागतं.

"प्रत्येक महिलेनं गॅफिंगचं काम एकदा तरी करावं असं मला वाटतं. आम्ही नवा विचार मांडू शकतो." असं हेतल सांगतात.

स्टोरी- जाल्टसन एसी आणि विष्णू वर्धन

निर्माती - जान्हवी मुळे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)