#BollywoodSexism : लैंगिक शोषण होत असेल तर बोललं पाहिजे – गौरी शिंदे

#BollywoodSexism : लैंगिक शोषण होत असेल तर बोललं पाहिजे – गौरी शिंदे

पुरुषी दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या ड्रीम गर्ल्सना भेटा बीबीसीच्या खास सीरिजमध्ये.

बॉलिवुडमधलं सेक्सिट आहे का? लिंगभेद करतं का? 'ड्रीम गर्ल्स'या सीरिजमधून याविषयी बोलत आहे 'ड्रीमगर्ल' आहे चित्रपट दिग्दर्शिका गौरी शिंदे.

"सिनेक्षेत्रातच नव्हे तर सगळ्यांच क्षेत्रांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार घडतात. बॉलीवुडमध्ये मला व्यक्तिशः असा अनुभव आलेला नाही. मात्र इतरांना येत असल्याचे किस्से माझ्या कानावर आले आहेत," असं सांगत आहेत दिग्दर्शिका गौरी शिंदे.

"बॉलीवुडमध्ये कोणावर जर लैंगिक शोषण होत असेल तर त्यांनी त्यावर बोललं पाहिजे. कारण याविषयी बोलण्याची सध्याची वेळ आणि वातावरण योग्य आहे," असं गौरी सांगतात.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)