#BollywoodSexism : 'सिनेसृष्टीतला लिंगभेद संपायला बराच वेळ लागेल'

पुरुषी दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या ड्रीम गर्ल्सना भेटा बीबीसीच्या खास सीरिजमध्ये. या सीरिजमध्ये आज भेटू अभिनेत्री सोनम कपूरला.

चित्रपटसृष्टीत लैंगिक भेदाभेद आहे आणि तो संपायला अजून बराच काळ जावा लागेल, अशी भूमिका अभिनेत्री सोनम कपूरनं मांडली आहे.

ती नेमकं काय म्हणाली हे ऐकण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

सोनम म्हणते - "आपण तीन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. मुळात, बऱ्याच महिलांना भेद होतोय हेच लक्षात येत नाही. काही वेगळं होत आहे, असं वाटतंच नाही. दुसरं असं की, नेहमी गप्प बसायला सांगितलं जातं. काही घडलं असं दाखवूच नका, असं सांगितलं जातं आणि तिसरं म्हणजे, तिचाच दोष होता, असं म्हणून मोकळं व्हायचं.

हिंदी सिनेसृष्टीतली ही दरी कमी करायला अजून किती काळ लागेल? या प्रश्नावर, सोनम म्हणते, "खूप काळ लागेल. आपल्याकडे पुरुषकेंद्री सिनेमे बनवले जातात. सिनेमाचे नायकच प्रेक्षक आणतात. आर्थिकदृष्ट्या त्यांना जास्त फायदा मिळणं स्वाभाविक आहे. आपल्याकडे महिलाकेंद्री व्यावसायिक सिनेमे यायला हवेत. म्हणजे परिस्थिती बदलेल."

"महिला आणि पुरुषांना समान महत्त्त्वाच्या भूमिका असाव्यात. म्हणजे महिला प्रेक्षकही वाढतील. पण त्याला बराच वेळ लागेल", असंही सोनम म्हणाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)