#BollywoodSexism : 'हा ट्रेंड नसून लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे'

#BollywoodSexism : 'हा ट्रेंड नसून लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे'

पुरुषी दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या ड्रीम गर्ल्सना भेटा बीबीसीच्या खास सीरिजमध्ये. या सीरिजमध्ये आज भेटू अभिनेत्री ऋचा चड्ढाला.

"आपल्याकडे पीडितेलाच दोष दिला जातो. त्यांना बोलण्याची संधी देण्याऐवजी पहिली शंका त्यांच्यावरच घेतली जाते.

"एखादं प्रकरण झाल्यावर विशाखा गाईडलाइन्सची अंमलबजावणी केली जाते. खरं तर विशाखाची अमंलबजावणी आधीपासूनच केली जावी," असं म्हणणं आहे अभिनेत्री ऋचा चड्ढा हिचं.

फिल्म इंडस्ट्री समाजाचाच एक भाग आहे. त्याचं प्रतिबिंब बॉलीवूडमध्येही दिसतं. लोकांना रोजगार जाण्याची भीती वाटते. अनेकदा व्यावहारिक कारणामुळे लोक पुढए येत नाहीत, असं निरीक्षण अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने नोंदवलं.

ती नेमकं काय म्हणाली हे ऐकण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

तुम्ही हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)