पाहा व्हीडिओ : पोलर बिअर शिकार कशी करतात बघायचंय?

पाहा व्हीडिओ : पोलर बिअर शिकार कशी करतात बघायचंय?

पोलर बीअरच्या हालचालींवर आणि अन्नासाठीच्या शिकारींवर लक्ष ठेवण्याकरता त्यांच्या गळ्यात जीपीएस कॅमेरा लावण्यात आला होता.

2014पासून 3 वर्षं 3 मादी अस्वलांवर पाळत ठेवण्यात आली होती. जास्तीत जास्त उर्जा मिळेल अशा आहाराच्या शोधासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो.

आहारातून जास्त फॅट्स मिळवण्यासाठी ते सील या जलचर प्राण्यावर अवलंबून असतात. पण आता आर्क्टिक भागातला बर्फ कमी व्हायला लागल्यामुळे सीलही गायब होत आहेत. त्यामुळे या ध्रुवीय अस्वलांचा अन्नासाठीचा संघर्ष वाढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.

अस्वलाच्या नजरेतून आर्क्टिकचा बर्फाळ प्रदेश कसा दिसतो हे पाहण्यासाठी या व्हीडिओवर क्लिक करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)