पाहा व्हीडिओ - 'प्राण गेला तरी जमीन देणार नाही' : राजापूर रिफायनरीला विरोध का?

"प्राण गेला तरी जमीन देणार नाही," अशी ठाम भूमिका 'वेस्ट कोस्ट रिफायनरी एंड पेट्रोकेमिकल्स प्रकल्पा'विरोधात शेतकरी संजय जठार यांनी घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर होणारा हा प्रकल्प 2022 सालापर्यंत कार्यरत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राजापूर-नाणार परिसरातली सुमारे 15000 एकर जमीन आवश्यक आहे.

ही रिफायनरी पर्यावरणपूरक असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे. पण स्थानिकांनी मात्र या प्रकल्पाला विरोध केला आहे.

  • शूटिंग आणि एडिटिंग : शरद बढे
  • निर्मिती : जान्हवी मुळे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)