#BollywoodSexism : 'लैंगिक शोषणाच्या कटू सत्याला वाचा फोडावीच लागेल'

#BollywoodSexism : 'लैंगिक शोषणाच्या कटू सत्याला वाचा फोडावीच लागेल'

"पुरुष आणि स्त्रिया आहेत, तिथे लैंगिक शोषणाचे प्रकार होत असतातच. हे कटू सत्य आहे," असं म्हणणं आहे गीतकार कौसर मुनीर यांचं.

कौसर यांचे शब्द मनाला भिडणारे. त्यांची बॉलीवुडमधली गाणी युवा मनाला स्पर्श करतात, मग ते 'यंगिस्तान' मधलं 'सुनो ना संगेमरमर...' असो, 'इशकझादे' मधलं 'परेशान, परेशान' असो, किंवा 'लव्ह यू झिंदगी'चं टायटल ट्रॅक.

कौसर सांगतात, "माझं कुटुंब मला आनंदाने पाठिंबा देतं. इतर महिलांनाही जेव्हा अशी साथ मिळेल तेव्हा या क्षेत्रात मोठ्या संख्येनं महिला येऊ लागतील."

"मला नेहमी वाटतं, जर जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःच्या घरात बदल घडवावा लागेल. याला वाचा फोडावी लागेल. आपल्या पुरुष नातेवाईकांचा बचाव करणं बंद करावं लागेल," असंही त्यांना वाटतं.

पाहा संपूर्ण व्हीडिओ.

हेही नक्की पाहा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)