पाहा व्हीडिओ : त्याला मुलांनी बनवलं स्टार!

पाहा व्हीडिओ : त्याला मुलांनी बनवलं स्टार!

बीबीसीच्या एका टीव्ही शोमध्ये वडिलांची मुलाखत सुरू असतानाच अचानक दोन लहान मुलं फ्रेममध्ये आली. या 'प्रसंगा'ला 2018चा ब्रॉडकास्ट पुरस्कार मिळाला.

प्रा. रॉबर्ट केली यांची बीबीसीवर मुलाखत सुरू होती. अचानक त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडून लहान मुलगी त्यांच्यापाशी आली. पाठोपाठ बाबागाडीतून आणखी एकानं तिथं एंट्री घेतली.

हा व्हीडिओ एवढा व्हायरल झाला की, केली बनले 'बीबीसी डॅड'! हा सगळा प्रसंग ठरला moment of the year!

या सेलिब्रिटीपणानं केली चांगलेच अवघडले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)