पाहा व्हीडिओ : केराबाईंच्या आवाजावर अख्खा माणदेश फिदा

केराबाई सरगर माणदेशी तरंग वाहिनी ९०.४ वर त्या लोकगीतांचा कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या आवाजावर अख्खा माणदेश फिदा आहे.

"लहानपणापासून माझं गाणं सुरू आहे. माझी आई जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आईच्या आणि आजीच्या ओव्या ऐकत ऐकत मलाही गाण्याचा छंद लागला. हाच गाण्याचा छंद मला रेडिओ केंद्रापर्यंत घेऊन गेला," असं त्या सांगतात.

१९९८पासून त्या रेडीओवर गात आहेत आणि गावकरीसुध्दा त्यांचे कार्यक्रम आवडीने ऐकतात.

बीबीसी प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)