पाहा व्हीडिओ - कोरफड आरोग्यासाठी चांगली की वाईट?

पाहा व्हीडिओ - कोरफड आरोग्यासाठी चांगली की वाईट?

आयुर्वेदात कोरफडीचा विविध औषधांसाठी वापर केला जातो. औषधी वनस्पती म्हणून कोरफड म्हणजे अॅलो व्हेरा जगभर पोचली आहे. त्वचेच्या मलमापासून ते औषधी पेय पदार्थांपर्यंत कोरफडीचा वापर होत आहे. पण त्याचा पोटात घ्यायच्या ठरावीक औषधासाठी वापर केल्यानं दुष्परिणाम होऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मलम म्हणून वापरायला, जखम बरी करण्यासाठी कोरफड योग्य आहे. पण कोरफडीचं सेवन केल्यानं किंवा त्या पासून बनवलेल्या पाचक गोळ्या खाल्ल्यानं त्वचेवर साईड इफेक्ट होऊ शकतात आणि क्रँप्स येऊ शकतात. म्हणून ते खाणं टाळावं असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)