नेतान्याहूंनी इराणी ड्रोनचे अवशेष दाखवत दिला इशारा

नेतान्याहूंनी इराणी ड्रोनचे अवशेष दाखवत दिला इशारा

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्यूनिक इथं आयोजित सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये इराणवर हल्लाबोल केला. इराण हा जगाला सर्वांत मोठा धोका असल्याचा आरोप त्यांनी केला.

बेंजामिन नेतान्याहू यांनी ड्रोनचा अवशेषच सादर केला. या सुरक्षा परिषदेत इराणचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इराणी परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद जरिफ यांचं नाव घेत त्यांनी आमची परीक्षा पाहू नका, असा इशारा दिला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)